सरकारी कार्यालये डासमुक्त करा

By admin | Published: June 12, 2015 05:49 AM2015-06-12T05:49:04+5:302015-06-12T05:49:04+5:30

आपल्या आवारात डास प्रतिबंधक उपाययोजनांचे नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सरकारी व निमसरकारी कार्यालयांना

Government offices get rid of mosquitoes | सरकारी कार्यालये डासमुक्त करा

सरकारी कार्यालये डासमुक्त करा

Next

मुंबई : आपल्या आवारात डास प्रतिबंधक उपाययोजनांचे नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सरकारी व निमसरकारी कार्यालयांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे़ डास प्रतिबंधक समितीच्या बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी असा सज्जड इशारा देऊन डास प्रतिबंधक उपाययोजना तत्काळ पूर्ण करून घेण्याची ताकीद सर्व आस्थापनांना दिली आहे़
डास प्रतिबंधक समितीची बैठक पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात आज घेण्यात आली़ या समितीचे अध्यक्ष म्हणून अजय
मेहता यांनी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला़ पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार पसरण्याचा धोका असल्याने डासांची पैदास करणाऱ्या अळ्या नष्ट करण्याचे लक्ष्य या प्राधिकरणांना देण्यात आले़ मात्र अनेकवेळा सरकारी कार्यालये अशा सूचनांकडे कानाडोळा करतात़
सरकारी कार्यालयातील पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक अथवा परिसरात डासांची पैदास होत असल्याने मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येते़ त्यामुळे पावसाळ्यात आपल्या कार्यालयांच्या आवारात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना सर्व सरकारी प्राधिकरणांना करण्यात आली आहे़ यामध्ये कुचराई करणाऱ्या कार्यालयांना मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी या बैठकीतून दिला़ (प्रतिनिधी)

Web Title: Government offices get rid of mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.