Join us

मुंबईतील 7 धोकायदायक इमारती खाली करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 8:24 PM

या इमारती तातडीने रिकाम्या करून संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम म्हाडामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार आहे

मुंबई: शहरातील सुमारे १४ हजार २८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. दरवर्षी म्हाडाच्या आर आर मंडळामार्फत  या इमारतींचे  सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. या वर्षी एकूण ७ इमारती या अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. यातील ६ इमारती ह्या मागील वर्षीच्या आहेत  या इमारतीमध्ये २१४ निवासी अधिक १८९ अनिवासी आहेत एकूण ४०३  रहिवाश्यांपैकी  १११ रहिवाश्यानी पर्याय व्यवस्था केली आहे  तर फक्त  २ रहिवाश्यांना संक्रमण शिबिरात पर्यायी जागा म्हाडातर्फे देण्यात आली आहे.  या इमारती तातडीने रिकाम्या करून संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम म्हाडामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार आहे

या इमारती रिकामी कामी रहिवाश्यांनी म्हाडाला सहकार्य करावे तसेच पावसाळ्यात  वित्त व जीवित हानी पहाता म्हाडाने या रहिवाश्याना घरे खाली करण्याची गेल्या वर्ष्या पासून नोटीस दिली असताना या रहिवाश्याना १० दिवसांच्या आता सक्तीने घराबाहेर काढण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांना दिले असल्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी आज म्हाडा मुख्यलयात आयोजित पत्रकार परिषेदेत सांगितले. येत्या १५ दिवसांत मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीं संधर्बात धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महेता यांनी दिली. .   

इमारती धोकादायक जाहीर करूनही काही इमारतीतील रहिवाशांनी बाहेर काढण्यास म्हाडाला अपयश येत असून ,आता म्हाडाने १० दिवसात रहिवाश्याना सक्तीने घराबाहेर काढा त्यामुळे  रहिवाश्यांनी स्वताहून पुढे येउन म्हाडाला घरे खाली करण्यास  सहकार्य करावे असे आव्हान यावेळी महेता यांनी केले.  

१)  १४४, एम. जी. रोड (एक्स्पनेंड मेन्शन)

२) २०८-२२०,काझी सय्यद स्ट्रीट  

 ३)१०१-१११ बारा इमाम रोड (सी ७२५५) 

४) ३०-३२,२री सुतारगल्ली (६६२६(१) 

५) ६९-८१खेतवाडी ३री गल्ली गणेश भुवन (१७६७) 

६ )३९ चौपाटी सी फेस 

७) इमारत क्र ४६-५०   लक्की मेंशन क्लेअर  रोड 

टॅग्स :पाऊसइमारत दुर्घटना