एसआरएमधील घर खरेदीदारास शासनाचा दिलासा
By admin | Published: September 28, 2016 02:20 AM2016-09-28T02:20:46+5:302016-09-28T02:20:46+5:30
एसआरए प्रकल्पातील इमारतीमधील घरे खरेदी-विक्री करणाऱ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिले आहे.
मुंबई : एसआरए प्रकल्पातील इमारतीमधील घरे खरेदी-विक्री करणाऱ्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिले आहे. त्यासाठी नियमात बदल करण्याची तयारीही महेता यांनी दाखवली आहे. आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर महेता बोलत होते. मुंबईमध्ये, विशेषत: दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील १० वर्षांपूर्वीच्या जिजामाता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील घरे खरेदी-विक्री करणाऱ्यांना शासनांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे आ. लोढा यांनी निदर्शनास आणले. त्यांनी शासनाला एक निवेदन दिले आहे. त्यावर महेता म्हणाले यांनी एसआरएमधील घरे खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना योग्य ते संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत एसआरएचे सीईओ विश्वास पाटील, ताडदेव तुलसीवाडी व एमपी मिल कंपाउंड येथील प्रतिनिधी सामंत भाई गिलतर, महेश महीडा, गिरिश विंजूडा, धनजीभाई वाघ इत्यादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)