राज्यात गुंतवणुकीसाठी सरकारतर्फे पायघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:38 AM2018-02-07T05:38:14+5:302018-02-07T08:01:37+5:30
राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणारी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद १८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी उद्योग क्षेत्रांशी संबंधित धोरणांची घोषणा करीत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले.
मुंबई : राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणारी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद १८ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी उद्योग क्षेत्रांशी संबंधित धोरणांची घोषणा करीत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले.
अवकाश व संरक्षण क्षेत्रात १ लाख रोजगारनिर्मिती, तर काथ्या धोरणाद्वारे ५० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. फिनटेक धोरण ३०० स्टार्ट अप उद्योगांचे दालन उघडणार आहे. या शिवाय, विदर्भ, मराठवाडा या कापूस उत्पादक भागांत रोजगार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी रेडीमेड गारमेंट आणि मुंबईसह राज्याच्या अन्य भागांत जेम्स अँड ज्वेलरीच्या उत्पादनास चालना देण्यासाठीच्या धोरणासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्याच्या सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीसाठी लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकात्मिक लॉजिस्टिक पार्क धोरणास मान्यता देण्यात आली. राज्यात २५ बहुविध लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. राज्याचे वस्त्रोद्योग धोरण मंजूर झाले असून, त्या अंतर्गत येत्या ५ वर्षांत राज्यात ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन १० लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ५ वर्षांसाठीच्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी देण्यात आली. त्यात २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, १ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य असेल.
>मोठी गुंतवणूक अपेक्षित
मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून मोठी औद्योगिक गुंतवणूक राज्य सरकारला अपेक्षित असून, त्याकरिता उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आज मंजूर झालेली धोरणे अत्यंत मोलाची ठरतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
>अशी आहेत धोरणे
36
हजार कोटींची वस्त्रोद्योग धोरणात गुंतवणूक
10
लाख रोजगार अवकाश धोरणाद्वारे
१ लाख रोजगार
काथ्या उद्योग धोरणाद्वारे
50
हजार रोजगारनिर्मिती होणार
25
हजार कोटींची गुंतवणूक इलेक्ट्रिक वाहननिर्मितीत
01
लाख रोजगार देणार
फिनटेक धोरण देणार; ३०० स्टार्ट अप उद्योग, गारमेंट, जेम्स अँड ज्वेलरी उत्पादनात झेप