सरकार म्हणजे सावळागोंधळ, ओबीसींवर भाजपाकडून अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:14 AM2017-09-24T01:14:13+5:302017-09-24T01:15:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वच प्रश्नांवर सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वच प्रश्नांवर सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
ओबीसी समाजाच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाकडे सरकार कमालीचे दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तताही नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. आम्ही जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होत आहोत, त्यामुळेच सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते. सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे तटकरे म्हणाले. अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात मोर्चा काढला. कोळशाअभावी भारनियमनाचा त्रास होत आहे. एकाही शेतकºयाला पैसे मिळाले नाहीत. नाशिक जिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी मुलांचे जीव गेले. पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आपण आताच जागे न झाल्यास भविष्यात आपल्याला फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांचे विचार दिसणार नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेले आरक्षण काढून घ्यायला हे सरकार मागेपुढे बघणार नाही. आरक्षण संपवण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. भाजपा सरकारच्या काळात जेवढा अन्याय ओबीसीवर झाला, तो आजपर्यंत कधीही झाला नव्हता.
आपण आताच जागे न झाल्यास, भविष्यात आपल्याला फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांचे विचार दिसणार नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेले आरक्षण काढून घ्यायला हे सरकार मागेपुढे बघणार नाही. आरक्षण संपविण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. भाजपा सरकारच्या काळात जेवढा अन्याय ओबीसीवर झाला, तो आजपर्यंत कधीही झाला नव्हता.