मुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी राज्य सरकार आणि पालिकेची रुग्णालये राखीव करण्यात आल्याने सामान्य रुग्णांची अडचण होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांना, नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जावे लागत आहे. या रुग्णांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार होत आहेत. खासगी कोरोना चाचणीचा खर्च आणि खासगी उपचारांचा खर्च असा नाहक भुर्दंड सामान्य रुग्णांना सोसावा लागत आहे. याचा विचार करून, गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांची कोरोना चाचणी आणि त्यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.
खासगी रुग्णालयाचा खर्च सरकारने करावा, शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:40 AM