मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी सरकारने निवेदन द्यावे
By admin | Published: March 30, 2017 03:31 AM2017-03-30T03:31:11+5:302017-03-30T03:31:11+5:30
भिवंडीत कॉँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या करणारा भाजपाचा पदाधिकारी असून, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला
मुंबई : भिवंडीत कॉँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या करणारा भाजपाचा पदाधिकारी असून, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी केला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणी सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.
मनोज म्हात्रे यांची हत्या १४ फेब्रुवारी रोजी झाली. दीड महिना उलटूनही आरोपींचा तपास लागलेला नाही. याबाबतचा स्थगन प्रस्ताव काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी मांडला आणि आरोपींना किती दिवसात पकडले जाईल, असा सवाल केला. त्यावर बोलताना आरोपी भाजपाचा पदाधिकारी असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सवाल निर्माण झाला आहे, त्यामुळे हा विषय स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेला घ्यावा, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळत सरकारला या प्रकरणी निवेदन सादर करण्याचे निर्देश
दिले.