“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:19 IST2025-03-07T06:18:10+5:302025-03-07T06:19:03+5:30
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.

“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेत गुरुवारी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार ४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.
गुरुवारी या मागण्यांवर चर्चेत नीलेश राणे म्हणाले, या आर्थिक वर्षात तीन पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, त्या १ लाख ३७ हजार कोटीच्या झाल्या आहेत. आपला २०२४-२५ चा अर्थसंकल्प ६ लाख ६९ हजार कोटीचा आहे. अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्या २०.४५ टक्के होतात. म्हणजे १०० रुपयांवर १२० रुपये झाले. कंपनी कायद्यानुसार ही बाब ३० टक्के असेल तर ती दिवाळखोरी असते. सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे.