मुंबई : व्हॉट्सअॅप हॅक करून लोकांची माहिती चोरली जाते, भारतातसुद्धा असे प्रकार घडत आहेत, हा प्रकार गंभीर आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचे प्रकार घडतात याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने एवढे करूनही सत्तेवर राहू नये, पायउतार व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी उपस्थित होते. सरकारने व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी पाटील म्हणाले की, व्हॉट्सअॅपची हेरगिरी सुरू असल्याची केंद्र सरकारला अगोदरच माहिती होती. आतासुद्धा त्यांना ती दिली आहे. कोणत्या संघटनेने ही पाळत ठेवली होती, यासाठी केलेला प्रचंड कुठून आला, कोणी फंडिंग केले, याचा तपास केंद्राने करावा.
महाराष्ट्रात काही दलित नेत्यांना नक्षलवादी ठरवण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्यावर पाळतही ठेवली. कोणत्या दलित नेत्यांना या गोष्टींचा वापर करून नक्षलवादी ठरवले, याचासुद्धा तपास व्हावा. एसआयटी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली स्थापन करावी. यामध्ये बड्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको, असेही ते म्हणाले. तर राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हेरगिरीची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. संजय जोशी, हार्दिक पटेल हे हेरगिरीचे बळी आहेत. तुम्ही तुमच्या घरात काय करत आहात, यावरही नजर ठेवण्यात येते. परंतु हे करणाºयांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेचे निक्सन फोन टॅपिंग किंवा कर्नाटकचे हेगडे प्रकरण असो त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला, असेही ते म्हणाले.‘फोडाफोडीचे राजकारण करणाºयांना धडा शिकवू’शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावर जर शिवसेनेचे आमदार त्यांच्या संपर्कात असतील तर पक्ष सोडणाºयांना आम्ही धडा शिकवू, कोणालाही सोडणार नाही. नेते सोडून गेले तर त्यांच्या जागी उभे राहणाºया शिवसेना उमेदवाराला आम्ही सगळे पाठिंबा देऊन निवडून आणू. पक्ष सोडणाºयांना आम्ही धडा शिकवला आहे, आम्हाला सोडून जाणाºया ८० टक्के लोकांना आम्ही पराभूत करून दाखवले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.