Join us

राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीनचाकी, पण स्टिअरिंग माझ्याच हातात, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 7:48 AM

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती आणि त्यामधील आपल्या भूमिकेबाबतचं चित्र स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

ठळक मुद्दे हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, पण ते गरीबांचं वाहनही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंयआमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनामध्ये प्रसिद्ध होत असलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती आणि त्यामधील आपल्या भूमिकेबाबतचं चित्र स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या माने उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे. या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर ३०-३५ चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीच्या पहिल्या भागात कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत. ताप येणे हेही कोरोनाचे लक्षण आहे. काही जणांची चव जाते. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचे आयुष्य बेचव झालेले असू शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. बोलणारे बोलत राहतील. कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही कदाचित त्यांची पोटदुखी असेल, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. खा. संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आमदारांचा पगार महाराष्ट्राला  न देता त्यांनी तो दिल्लीत दिला. त्यामुळे कदाचित ते सतत दिल्लीत जात असावेत,

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा