बीटी बियाणांचा अहवाल सरकारने दडपला - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:11 AM2017-11-15T03:11:53+5:302017-11-15T03:12:56+5:30
बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता.
मुंबई : बीटी बियाणाला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतक-यांचे नुकसान होत असल्याचा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. तो शासनाने जाणीवपूर्वक दडपल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला.
अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत. बिटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. हा एक मोठा ‘कॉटन सीड स्कॅम’असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बीटी बियाणासाठी दिलेल्या अहवालावर सरकार काहीच कार्यवाही करत नाही, ही बाब लक्षात आल्याने आपण शासनाला ६ जुलैला पत्र लिहून अवगत केले होते. पत्राची प्रत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यासोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही पाठवली होती. मात्र त्याची दखल न घेतल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे.