मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार; मंत्री लोढा यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 03:31 PM2023-10-04T15:31:41+5:302023-10-04T15:33:03+5:30

लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

Government to build 40,000 toilets for slum dwellers in Mumbai suburbs; Minister Mangalprabhat Lodha's information | मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार; मंत्री लोढा यांची माहिती

मुंबई उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी सरकार ४० हजार शौचालये बांधणार; मंत्री लोढा यांची माहिती

googlenewsNext

मुंबई: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत असून, त्याद्वारे लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे आज पालकमंत्री लोढा यांनी लोकार्पण केले. वांद्रे पश्चिम येथील नित्यानंद नगर येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची स्वच्छतागृहाची मागणी आजवर दुर्लक्षित होती. ती सोडवण्यासाठी पालकमंत्री लोढा यांनी पुढाकार घेतला असून, येत्या काळात उपनगरातील वस्त्यांमध्ये ४०,००० शौचालये बांधण्यात येणार आहेत. यापैकी १२,००० शौचालये नव्याने बांधण्यात येतील, तर २८,००० शौचालयांची पुनर्बांधणी करून त्यांना नवे रूप देण्यात येणार आहे. लोढा यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या प्रकल्पासाठी पालकमंत्री निधीतून आणि मुंबई महापालिकेद्वारे ६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

प्रसंगी बोलताना पालकमंत्री लोढा म्हणाले, की मुंबई उपनगरातील झोपडपट्टीवासियांच्या मूलभूत गरज लक्षात घेऊन आखण्यात आलेल्या शौचालय उभारण्याच्या योजनेचा आज शुभारंभ झाला याचा आनंद आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना अत्याधुनिक दर्जाची, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये वापरण्यास मिळतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण मुंबई उपनगरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे सरकार हे नागरिकांसाठी नागरिकांमध्ये जाऊन काम करणारे सरकार असून, नागरिकांच्या कोणत्याही मागणीकडे किंवा समस्येकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ, असं मंत्री लोढा यावेळी म्हणाले.

Web Title: Government to build 40,000 toilets for slum dwellers in Mumbai suburbs; Minister Mangalprabhat Lodha's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.