शहिदाच्या पत्नीकडून सरकारला हवी बक्षिसी
By Admin | Published: October 1, 2014 02:48 AM2014-10-01T02:48:59+5:302014-10-01T02:48:59+5:30
शहीद बाबाजी जाधव यांच्या पत्नी इंदिरा यांना वयाच्या 72 वर्षार्पयत भूखंड न देणा:या राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर हा भूखंड देऊ केला
>मुंबई : शहीद बाबाजी जाधव यांच्या पत्नी इंदिरा यांना वयाच्या 72 वर्षार्पयत भूखंड न देणा:या राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर हा भूखंड देऊ केला असून, आता त्यासाठी सरकारला त्यांच्याकडून बक्षिसी हवा आह़े ही धक्कादायक बाब निदर्शनास आल्यानंतर संतप्त झालेल्या न्यायालयाने मंगळवारी शासनाला याचे प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल़े
महत्त्वाचे म्हणजे शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणारा भूखंड घेण्यासाठी बाबाजी यांच्या पत्नी इंदिरा यांना न्यायालयात याचिका दाखल करावी लागली, याची दखल घेत व सरकारी कारभारावर टीका करीत न्यायालयाने या महिलेला भूखंड देण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिल़े तसेच या महिलेला सरकारने नुकसानभरपाई द्यावी, असेही सांगितल़े
त्यातून धडा घेत शासनाने या महिलेला तात्काळ भूखंड देणो अपेक्षित होत़े मात्र खेडच्या भू-अधीक्षकांनी या विधवेला कार्यालयात हजर राहण्यास सांगितल़े तसेच त्यांना शेतजमीन नेमकी कोठे देणार, हेही प्रशासनाने स्पष्ट केले नाही़ त्यामुळे इंदिरा यांनी अॅड़ अविनाश गोखले यांच्यामार्फत अर्ज करून भू-मोजणीचे पैसे नुकसानभरपाईच्या पैशातून घ्यावेत व आपणच नेमलेल्या अधिकृत व्यक्तीकडून कागदोपत्री कामकाज करून घ्यावे, अशी विनंती केली़
या अर्जावर न्या़ अभय ओक व न्या़ गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात अॅड़ गोखले यांनी शासनाने भूखंड देण्यासाठी इंदिरा यांच्याकडे नजराणा मागितल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े त्याची दखल
घेत न्यायालयाने हे आदेश
दिल़े (प्रतिनिधी)