मुंबई : दंतशल्यचिकित्सा क्षेत्रामध्ये फार मोठ्या तंत्रज्ञानात्मक सुधारणा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दंतशल्य क्षेत्रातील सामुग्री आणि यंत्रे तसेच उपचारांमध्ये हव्या त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूशास्त्रमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काढले.रविवारी प्रभादेवी येथील आयडीए मुख्यालायात इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक आणि संशोधन केंद्राचे तसेच दंत दवाखान्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयडीएचे अध्यक्ष डॉ विश्वास पुराणिक, आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ अशोक ढोबळे उपस्थित होते. या डेंटल क्लिनिकची स्थापना दातांच्या देखभालीचे काम आणि आधुनिक दंत प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. त्याचा सर्व भर हा गरीब मुलांवर असेल आणि त्यांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिले जातील.ही आयडीएचे संस्थापक डॉ. रफीउद्दीन अहमद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे काम करण्यात येणार आहे. तंत्रज्ञातील सुधारणा आणि नवीन सामुग्रीचा झालेला विकासयामुळे दंत आरोग्यसेवेचा दर्जा फार मोठ्या प्रमाणावर सुधारला आहे, असेही डॉ हर्षवर्धन यांनी याप्रसंगी सांगितले.डॉ अशोक ढोबळे यांनी म्हटले की, या केंद्रावर सर्वच आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यातून दातांच्या शल्यचिकित्सकांना दंत संशोधन व्यावसायिक आधुनिकतेचा प्रसार करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यातूनही गरीब रुग्णांना मदत करण्यावर भर असेल. दंत विद्यापीठांमध्ये आवश्यक अशा पायाभूत सेवांचा नित्य अभाव राहिला आहे आणि त्यामुळे भावी विद्यार्थ्यांनाही संशोधनाची दृष्टी मिळत नाही. आयडीएने दंतसंशोधनासाठी जे केंद्र सुरु केले आहे, ते सुरु करण्यामागे हेसुद्धा एक कारण आहे.
दंतशल्यचिकित्सा क्षेत्रासाठी शासन कटिबद्ध, सामुग्री आणि यंत्रे तसेच सोयी उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 5:39 AM