Join us

मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी सरकार भूमिका घेईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:10 AM

मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे.

मुंबई : मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्याची गरज आहे. ती भूमिका सरकार नक्की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान भवनात दिली. वांद्रे येथे सुरू होणाºया मराठी भाषेच्या राज्यातील पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार, या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालीला देण्यात आला.मराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्हावे, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी विनंती ग्रंथालीने मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार, दीड वर्षानंतर वांद्रे पश्चिमेतील बँडस्टँड येथील महापालिकेची जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंगळवारी विधान भवनात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे औपचारिक कार्यक्रमात हा करार सुपुर्द करण्यात आला.ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ग्रंथाली काम करते आहे, पण दुर्दैवाने महापालिकेच्या एका निर्णयामुळे त्यांना कार्यालय रिकामे करावे लागले. याकामी आशिष शेलार यांनी पुढाकार घेत, हा विषय मार्गी लावला. त्या जागेचा करार ग्रंथालीकडे सुपुर्द करताना आनंद होत आहे. याशिवाय मराठी भाषेसाठी काम करणाºया विद्यापीठाच्या जागेचा करार आपण करत आहोत. मराठी भाषेचे काम करणाºया उपक्रमाला आवश्यक मदत करण्यात येईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.‘मराठी भाषेवर अभिजात भाषेची मोहर लवकरच उमटेल’ -मराठी भाषेवर अभिजात भाषेच्या दर्जाची मोहर लवकरच उमटेल. आम्ही त्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या असून, केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करत आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान भवनात कोमसापच्या शिष्टमंडळासह साहित्यप्रेमींना दिली.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून तातडीने घेण्यात यावा, या मागणीसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वाक्षरी मोहीम राबवून, तसेच आॅनलाइन आवाहन करूनही मुंबईकरांच्या स्वाक्षºया गोळा करण्यात आल्या होत्या.जमा झालेल्या स्वाक्षºयांचे निवेदन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना विधान भवनात देण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, विद्यमान केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांच्यासह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या वेळी ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल उपस्थित होते.ग्रंथालीला कार्यालयासाठी जागाग्रंथालीच्या कार्यालयासाठी माहीम टायकलवाडी येथील जागेचा करार ग्रंथालीकडे सुपुर्द करण्यात आला.२ वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने ग्रंथालीला विद्यमान कार्यालयाची जागा रिकामी करण्याची नोटीस दिली होती.त्यानंतर, झालेल्या कार्यवाहीनंतर मंगळवारी नव्या जागेचा करार देवेंद्र फडणवीस यांनी ग्रंथालीला सुपुर्द केला.

टॅग्स :मराठी भाषा दिन 2018देवेंद्र फडणवीस