Join us

सरकारी काम आता होणार वेळेत!

By admin | Published: April 29, 2015 2:12 AM

राज्यातील नागरिकांची कामे वा सेवा विशिष्ट कालावधीत पूर्ण होतील याची हमी देणाऱ्या सेवा हक्क कायद्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सही केली.

राज्यात सेवा हक्क कायदा लागू : नागरिकांची कामे न केल्यास शिस्तभंगाची कारवाईमुंबई : राज्यातील नागरिकांची कामे वा सेवा विशिष्ट कालावधीत पूर्ण होतील याची हमी देणाऱ्या सेवा हक्क कायद्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सही केली. त्यामुळे हा कायदा राज्यात लागू झाला असून, यापुढे कामचुकारपणा करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ५०० रुपये ते ५००० रुपयांपर्यंतचा दंड केला जाईल. शिवाय, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईदेखील होऊ शकेल. या कायद्यामुळे ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या दप्तरदिरंगाईच्या उक्तीला चाप बसणार आहे. या कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असून, राज्य सेवा हमी आयोग स्थापन करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यासाठी मुख्य सेवा हमी आयुक्त व सहा महसुली विभागांमध्ये प्रत्येकी एक सेवा हमी आयुक्त नियुक्त करण्यात येतील.च्सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाकडून अर्थसाहाय्य घेणाऱ्या सर्व संस्थांसाठी हा कायदा लागू राहील.च्कोणती सेवा किती दिवसांत पुरविली जाईल याचा उल्लेख प्रत्येक कार्यालयाबाहेर ठळकपणे करावा लागेल.च्विशिष्ट कालावधीत काम झाले नाही, तर त्याची तक्रार आॅनलाइनदेखील करता येईल.च्एखादी सेवा नाकारली गेली तर अर्जदाराला त्याविरुद्ध ३० दिवसांच्या आत प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल.