गरीबांना घरं देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:44 PM2018-10-23T16:44:39+5:302018-10-23T16:47:16+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. देशातील प्रत्येक बेघर नागरिकास 2022 पर्यंत घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, राज्यातील प्रत्येक नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी सरकारचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. आता, घरनिर्मित्तीला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महा-हाऊसिंग मंडळाच्या निर्मित्तीतून हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. देशातील प्रत्येक बेघर नागरिकांस 2022 पर्यंत घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे देण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी हे महामंडळ काम करणार आहे. महानगरांमध्ये मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ काम करणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हक्काची घरासाठी पायपीट करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय#MaharashtraCabinet
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 23, 2018
प्रधानमंत्री आवास योजनेत
मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ pic.twitter.com/zRh9RqdR4L