कोकणातील पुराकडे शासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:07 AM2019-08-12T06:07:07+5:302019-08-12T06:07:59+5:30
रायगड जिल्ह्यात गेले आठ दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे महाड तालुक्यात पुरसृश्य स्थिती उद्भभवली आहे. घरात, गोठ्यात आणि शेतीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रायगड/रत्नागिरी : रायगड जिल्ह्यात गेले आठ दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे महाड तालुक्यात पुरसृश्य स्थिती उद्भभवली आहे. घरात, गोठ्यात आणि शेतीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रस्त्यांचे मोठे
नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र सरकारचे नुकसानीकडे लक्ष नसल्याचे कोकणवासीयांचे म्हणणे आहे.
महाडमध्ये १ ते ८ आॅगस्टपर्यंत १,२३४ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे १,९४४ घरे, १,५०० दुकाने आणि १५ गोठ्यांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांत एनडीआरएफने महाड शहरातून ४००, बिरवाडी ७०, आसनपोई ९०, आके १०, भोराव २५, सव १६, दासगाव ३०, तेटघर १५, काचले ५, कोलोसे १० येथून ६७१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. परंतु, नुकसानीची आकडेवारी निश्चित न झाल्याने पूरग्रस्थांना आर्थिक मदत पोहोचण्यात अडचण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.