माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्याचे शासनाचे आश्वासन

By मनोहर कुंभेजकर | Published: March 4, 2023 04:59 PM2023-03-04T16:59:29+5:302023-03-04T17:00:00+5:30

मुंबई -राज्य माहिती आयोग कार्यालयातील व खंडपीठातील आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या दोन महिन्यात माहिती ...

Government's promise to fill the vacancies of Information Commissioner within two months | माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्याचे शासनाचे आश्वासन

माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्याचे शासनाचे आश्वासन

googlenewsNext

मुंबई -राज्य माहिती आयोग कार्यालयातील व खंडपीठातील आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या दोन महिन्यात माहिती आयुक्तांच्या सर्व रिक्त भरण्यात येतील. तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून दक्ष राहू  असे आश्वासन सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव प्रकाश इंदलकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशच्या शिष्टमंडळाला दिले.

तसेच जास्तीत जास्त जनमाहिती अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. त्याच बरोबर शालेय अभ्यासक्रमात माहिती अधिकार कायद्याचा सबोध परिचयात्मक पाठ समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

 माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने वरील मागण्यासाठी आझाद मैदानात दि, १ मार्च  पासून फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्राच्या तीस जिल्ह्यातून आलेले  शेकडो कार्यकर्ते उपोषण व धरणे आंदोलनास बसले होते. या  आंदोलनाकडे महाराष्ट्रातील हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेले होते. मागण्यांच्या दखल घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. असा सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार होता. अखेर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी दि, ३ मार्च रोजी शासनाने आंदोलनाची दखल घेतली आणि चर्चे साठी शिष्टमंडळाला बोलावले.

 शासनावतीने चर्चा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील  उपसचिव प्रकाश इंदलकर व  कक्ष अधिकारी अचला खांडेकर उपस्थित होत्या. तर माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने  प्रदेश अध्यक्ष सुभाष बसवेकर  व मुंबई शहर अध्यक्ष दिपक पाटील  हे आंदोलकांचे प्रतिनिधी म्हणून मंत्रालयात चर्चा करण्यासाठी गेले होते.

शासनांशी चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी झालेल्या चर्चेचा गोषवारा आझाद मैदानावर आंदोलन स्थळी उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दिला. आपले आंदोलन यशस्वी झाले याचे समाधान कार्यकर्त्यांमध्ये होते. ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला सोशल मिडीयावरून प्रचार प्रसार केला. व त्यांनी शासनाकडे ई -मेल करून आपली संघटीत शक्ती दाखवली या सर्व कार्यकर्त्यांकडे या यशाचे श्रेय जाते. भविष्यातही माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण असेच संघटीतपणे काम करीत राहू असा निर्धार यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी व्यक्त केला.
 

Web Title: Government's promise to fill the vacancies of Information Commissioner within two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई