Join us

उच्च शिक्षणासाठी शासनाची ‘स्वाधार’ योजना, जाणून घ्या लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 1:21 PM

शहरातील विद्यार्थ्यांना ६० हजार !

श्रीकांत जाधव

कशासाठी मिळते मदत ११वी, १२वी तसेच १२वी नंतरचे व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुंबईतील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंग होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत मदत दिली जाते.

शहरातील विद्यार्थ्यांना ६० हजार !     मुंबई शहर, मुंबई उपनगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३२ हजार रुपये भोजन भत्ता, २० हजार रुपये निवास भत्ता आणि ८ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ६० हजार रुपये दरवर्षी दिले जातात.     विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग पालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ हजार रुपये भोजन भत्ता, १५ हजार रुपये निवास भत्ता आणि ८ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ५१ हजार रुपये दरवर्षी दिले जातात.     उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये भोजन भत्ता, १२ हजार रुपये निवास भत्ता, ६ हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण ४३ हजार रुपये दिले जातात.     वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ५ हजार रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांना २ हजार रुपये दिले जातात.

योजनेसाठी पात्रताअनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी जात प्रमाणपत्र बंधनकारक असून, वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. किमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण, दिव्यांगांसाठी ३ टक्के आरक्षण, पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कोठे कराल ?या शैक्षणिक वर्षासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई यांच्याकडे ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत.

कशी असते मदत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम राज्य शासनाच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’तून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रशिष्यवृत्ती