Corona vaccine: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली कोरोनाची लस
By मुकेश चव्हाण | Published: March 5, 2021 12:16 PM2021-03-05T12:16:11+5:302021-03-05T12:30:41+5:30
भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोनाच्या कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला.
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोरोनाच्या कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari received his first dose of #COVID19 vaccine today at a govt hospital in Mumbai pic.twitter.com/uVKiufnt89
— ANI (@ANI) March 5, 2021
देशभरात दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत १ मार्च रोजी सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोना लस घेतली होती.
ज्येष्ठ नागरिकांनाच लस
दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर, ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि रक्तदाब व इतर आजार असलेल्या रुग्णांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. देशभरात २५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी, ६.४४ लाख नागरिकांना सोमवारीच लस देण्यात आली आहे.
कोविन अॅपवर नोंदणी नाही, वेबसाईटवरच नोंदणी
कोरोना लसीकरणासाठी पहिल्याच दिवशी कोविन अॅपवर नोंदणीसाठी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने अॅपवरील नोंदणी बंद केली असून वेबसाईटवरच लसीकरणाची नोंदणी करावी, असे आवाहन जनतेला केलंय. http://cowin.gov.in या साईटवर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयात घेतली लस
आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्ली हार्ट एंड लंग्स इंस्टीट्यूट येथे 250 रुपए देऊन कोरोनाची लस घेतली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीलाही लस टोचण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल राजकीय नेते आणि निवृत्त अधिकारी लस टोचून घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) टोचून घेतली आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोरोनाची लस घेतली. जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह काही डॉक्टर पवारांसोबत उपस्थित होते.