Join us

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डी. लिट; राजस्थानच्या विद्यापीठाकडून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 1:20 AM

जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली.

मुंबई : सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. 

राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी  समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे आपण मानतो, तरी देखील आयोजकांच्या प्रेमाखातर आपण  ही पदवी विनम्रपणे स्वीकारीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मी स्वत:ला राज्यसेवक समजतो व त्याच भावनेने काम करीत आहे असे ते म्हणाले. 

जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला यांनी विद्यापिठाच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राजस्थानी सेवा संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया, वनश्री वालेचा उपस्थित होते.

टॅग्स :भगत सिंह कोश्यारी