Bhagat Singh Koshyari मोठी बातमी! महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा; PM मोदींकडे व्यक्त केला 'निवृत्ती'चा मानस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 03:56 PM2023-01-23T15:56:36+5:302023-01-23T16:20:05+5:30

Governor Bhagat Singh Koshyari wants to 'retire'; Expressed his desire to resign to PM Modi: गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

Governor Bhagat Singh Koshyari wants to 'retire'; Expressed his desire to resign to PM Modi | Bhagat Singh Koshyari मोठी बातमी! महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा; PM मोदींकडे व्यक्त केला 'निवृत्ती'चा मानस

Bhagat Singh Koshyari मोठी बातमी! महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा; PM मोदींकडे व्यक्त केला 'निवृत्ती'चा मानस

googlenewsNext

मुंबई- गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. त्यामुळे कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती त्यांनी दिली.

Uddhav Thackeray: दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय, तिला...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित  काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.  या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.  

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि  आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.    

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari wants to 'retire'; Expressed his desire to resign to PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.