गोविंदांसह गोपिका फोडणार लाखोंच्या दहीहंड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 03:30 AM2018-08-31T03:30:50+5:302018-08-31T03:31:24+5:30

वर्सोवा विधानसभा मनसे आयोजित वॉर्ड क्रमांक ५९/६८ आणि स्वराज्य सामाजिक संस्था, राजमुद्रा सामाजिक संस्थेतर्फे २ लाख ५९ हजार ६८ रुपयांचे दहीहंडीसाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे.

Govinda, along with millions of donors, will break the guinea lobby | गोविंदांसह गोपिका फोडणार लाखोंच्या दहीहंड्या

गोविंदांसह गोपिका फोडणार लाखोंच्या दहीहंड्या

Next

मुंबई : दोन दिवसांवर दहीहंडी सण येऊन ठेपला असून सरावही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई, ठाण्यासह पूर्व व पश्मिच उपनगरात मोठ्या रकमेच्या हंड्यांचा शोध आता गोविंदा पथके घेऊ लागली आहेत. मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या रकमेच्या दहीहंड्या सज्ज झाल्या आहेत. आयोजकांनीही दहीहंडी सणाची धूमधडाक्यात तयारी सुरू केली आहे.

वर्सोवा विधानसभा मनसे आयोजित वॉर्ड क्रमांक ५९/६८ आणि स्वराज्य सामाजिक संस्था, राजमुद्रा सामाजिक संस्थेतर्फे २ लाख ५९ हजार ६८ रुपयांचे दहीहंडीसाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला, बॉन बॉन लेन येथील नालंदा बिल्डिंगसमोर दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी सहा-सात थरांची दहीहंडी लावणाऱ्याला रोख रक्कम व ट्रॉफी दिली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथील शिवसेना शाखा क्रमांक ६४ आणि अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या वतीने एकूण पारितोषिक ५०,५५५ रुपयांच्या किमतीची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ मरोशी रोड येथील दुर्गापाडा येथे आयोजक संजय खंडागळे यांची २ लाख २२ हजार २२२ रुपयांची मानाची दहीहंडी आहे. दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानात संस्कार प्रतिष्ठानतर्फे ११ लाख रुपयांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. या वेळी सात ते आठ थर लावणाºयांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह दिले जाईल, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी दिली. तसेच चांदिवली येथे १ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी उभारली जाणार आहे. कांजूरमार्ग येथे अशोक जोशी यांच्या स्मरणार्थ बाल गोपिकांसाठी कांजूर क्रीडा मंडळाच्या वतीने १ लाख रुपयांची दहीहंडी आयोजित केली आहे. कांजूरमार्ग पूर्वेकडील गोल्डन पॅलेसच्या पटांगणात मानवी मनोºयाचा खेळ रंगाणार असल्याचे महेंद्र रावले यांनी सांगितले.

एका व्यावसायिक कंपनीने आयोजित केलेल्या सराव शिबिरात जोगेश्वरी येथील मेघवाडी हिंदमाता गोविंदा पथकाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १४ सेकंदांत पाच थरांचा मनोरा रचत पाहणाºयांची मने जिंकली आहेत. या वेळी हिंदमाता गोविंदा पथकाने या सराव शिबिरात प्रथम क्रमांक पटकावला, अशा माहिती मेघनाथ सेवा मंडळाचे सचिव राजेंद्र सावंत यांनी दिली.
 

Web Title: Govinda, along with millions of donors, will break the guinea lobby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.