१२ आमदारांची नियुक्ती न करणाऱ्या राज्यपालांचे विमान महाविकास आघाडी सरकारने जमिनीवर आणले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:30+5:302021-02-12T04:07:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज भवनावरून ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानात गेल्यानंतर त्यांंना उतरवले ...

Govt brings down Governor's plane without appointing 12 MLAs? | १२ आमदारांची नियुक्ती न करणाऱ्या राज्यपालांचे विमान महाविकास आघाडी सरकारने जमिनीवर आणले?

१२ आमदारांची नियुक्ती न करणाऱ्या राज्यपालांचे विमान महाविकास आघाडी सरकारने जमिनीवर आणले?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज भवनावरून ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानात गेल्यानंतर त्यांंना उतरवले गेले असल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारने असे जाणीवपूर्वक केल्याचे विरोधकांचे म्हणणे मुंबई काँग्रेस सचिव धनंजय जुन्नरकर यांनी फेटाळले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात आला. या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्तीसाठी १२ जणांची यादी निश्चित करण्यात आली आहे; परंतु ८ महिने झाले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी आजतागायत स्वीकारलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय करत आहेत म्हणून त्यांना जमिनीवर आणल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा प्रस्ताव ८ महिने थंड बसत्यात ठेवून महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान केलेला आहे, असेही जुन्नरकर म्हणाले.

राज्यपाल जाणीवपूर्वक नियुक्ती करत नाहीत, हा संदेश पूर्ण देशाला देऊन त्यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. केंद्रात आणि राज्यात परस्परविरोधी पक्षांची सत्ता असल्याने अनेक निर्णय़ अशा राजकारणामुळे प्रक्रियांमध्ये अडकतात, असेही जुन्नरकर म्हणाले.

----------------------------------------

Web Title: Govt brings down Governor's plane without appointing 12 MLAs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.