सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:12 PM2023-07-19T12:12:55+5:302023-07-19T12:13:24+5:30

नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे

Govt Jobs... Recruitment of 1 thousand 782 Posts in Municipalities | सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

सरकारी नोकरी... नगरपालिकांमध्ये १ हजार ७८२ पदांची भरती

googlenewsNext

राज्य सरकारच्या नगरपालिका प्रशासन संचालनालय अधिनस्त ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क) मधील १ हजार ७८२  रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नगरविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत नगर परिषदेतील विविध पदांची भरती ही केली जाते. नगरपरिषदांची अ, ब व क वर्ग असे वर्गीकरण करण्यात आले आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायत या महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ द्वारे स्थापित आहेत. महाराष्ट्रात सध्या १६ अ वर्ग, ७५ ब वर्ग, १५४  क वर्ग नगर परिषदा असून १४३ नगरपंचायती आहेत. 

सर्व पदांसाठी पेपर क्रमांक एक याचा अभ्यासक्रम सारखाच असून, पेपर क्रमांक एक यात 
n मराठी - १५ प्रश्न, ३० गुण. प्रश्नांचा दर्जा इयत्ता बारावी 
n इंग्रजी - १५ प्रश्न, ३० गुण. प्रश्नांचा दर्जा बारावी 
n सामान्य ज्ञान - १५ प्रश्न, ३० गुण. प्रश्नांचा दर्जा पदवी 
n बौद्धिक चाचणी - १५ प्रश्न, ३० गुण. प्रश्नांचा दर्जा पदवी. कालावधी ७० मिनिटे 
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप पेपर क्रमांक दोन हा संबंधित विषयाशी संबंधित घटकावर आधारित असून, यात ४० प्रश्न, ८० गुण परीक्षेचा दर्जा 
पदवी परीक्षा वेळ ५० मिनिटे व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. असे एकूण दोन्ही पेपर मिळून १०० प्रश्न आणि २०० गुण असतील. 

एकूण २०० गुणांसाठी परीक्षा घेणार 
n महाराष्ट्र नगरपालिका भरतीअंतर्गत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येतील. पेपर १ मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर २ हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. 
n महाराष्ट्र नगरपालिका भरतीमधील अभियांत्रिकी सेवा, लेखापरीक्षण व लेखा विभाग, अग्निशमन सेवा आणि प्रशासकीय सेवांमधील पदांसाठी एकूण २०० गुणांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि सामान्य बुद्धिमत्ता या विषयाला ६० टक्के वेटेज आणि संबंधित विषयावरील घटकास एकूण ४० टक्के वेटेज आहे.

शैक्षणिक पात्रता 
अभियंता या पदासाठी उमेदवार हा पदानुसार संबंधित विषयांमध्ये इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लेखापाल, लेखापरीक्षक, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अग्निशमन अधिकारी पदांकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे.

 

Web Title: Govt Jobs... Recruitment of 1 thousand 782 Posts in Municipalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.