मुंबई : विश्व मराठी संमेलनाच्या अखेरच्या दिवशी विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल होती. उद्द्योगमंत्री उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, हे सरकार उद्योजकांना रेड कार्पेट घालणारे आहे. उद्योजकांना पूर्ण राजाश्रय दिला जाईल. तुम्ही आणखी मोठा व्यापार महाराष्ट्रामध्ये आणायला हवा. केंद्र सरकारची ताकद आमच्या पाठीशी आहे. आम्ही तुमच्यासोबत असून जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देऊ. हे सरकार आल्यानंतर २० हजार कोटींचा बाहेर जाणारा प्रकल्प थांबवला. १०० टक्के इन्सेंटिव्ह द्यावा लागला तरी देऊ; पण देशातील सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट स्कोप महाराष्ट्रात आहे हे दाखवून देऊ.
‘मैत्री कायदा ठरणार फायदेशीर’आपले सरकार मैत्री कायदा आणत आहे. ३० दिवसात उद्योजकांना सर्व परवानग्या मिळतील. यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच हा कायदा आणू.
पुढील संमेलन कोकणात!पुढील संमेलन कोकणात घ्या. हे संमेलन माहाराष्ट्राच्या प्रत्येक भागात व्हायला हवे. परदेशातील मराठी बांधवांनी पुढल्या वर्षी कुटुंबासोबत संमेलनाला यावे. तुमच्या पुढील पिढीला महाराष्ट्र समजू द्या.