पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका ऑनलाइन

By admin | Published: November 26, 2014 02:14 AM2014-11-26T02:14:03+5:302014-11-26T02:14:03+5:30

राष्ट्रीय शैक्षणिक सुरक्षा ठेव योजनेअंतर्गत मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

Graduate Certificate, Vocabulary Online | पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका ऑनलाइन

पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका ऑनलाइन

Next
देशात पहिले विद्यापीठ : मोबाइल, लॅपटॉप, संगणकावर गुणपत्रिका
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक सुरक्षा ठेव योजनेअंतर्गत मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार विद्याथ्र्याना परीक्षांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र घरबसल्या तत्काळ उपलब्ध होणार असून, प्रत्येक विद्याथ्र्याला आता गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र  डाऊनलोड करता येणार आहे. विद्याथ्र्याना ही सेवा उपलब्ध करून देणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या निकालाच्या गुणपत्रिका या योजनेद्वारे उपलब्ध होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ पूर्णत: ही प्रक्रिया राबवणार आहे.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्याथ्र्याना गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र कागदावर उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये अनेकदा गैरप्रकार होण्याचा धोकाही संभवतो. यासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक सुरक्षा ठेव योजनेंतर्गत विद्यापीठाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्र्याना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी उच्च प्रतीच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पाळले जाणार आहेत. तसेच सीडीएसएलच्या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रंचे जतन केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्याथ्र्याना त्यांची हरवलेली गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सुद्धा पुन्हा एकदा उपलब्ध होणार असून, ही सर्व शैक्षणिक कागदपत्रे डीमॅट पद्धतीने जतन करून ठेवली जाणार आहेत. ही सर्व कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्याथ्र्याना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून, लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आह़े या साहाय्याने विद्याथ्र्याना ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र याची सत्यता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)
 
योजनेची ध्येय    आणि उद्दिष्टय़े
राष्ट्रीय शैक्षणिक ठेव (नॅशनल अॅकॅडमिक डिपोझटरी) योजनेमध्ये सहभाग वाढविणो
गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रबाबत तसेच दीक्षान्त प्रमाणपत्रमध्ये होणा:या गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी
डिजिटल स्वाक्षरीयुक्त गुणपत्रिका आणि शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध करून देणो
उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना इतर शैक्षणिक संस्थांमध्ये गुणपत्रक पडताळणीसाठी लागणारा वेळ कमी करणो आणि इतर विद्यापीठांना सहजरीत्या पडताळणी आणि पात्रतेचे निकष जलदगतीने होण्यासाठी

 

Web Title: Graduate Certificate, Vocabulary Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.