लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्व शासकीय नोकरीच्या परीक्षा आणि पदांच्या अर्जासाठी पदवीधरांना एका वर्षात फक्त एक वेळचे वार्षिक शुल्क आकारण्याची तरतूद करू, असे आश्वासन पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले. भारतातील बेरोजगारीचा दर आठ टक्के असून, तो जगातील सर्वाधिक आहे. तथापि, देशातील पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर ४३ टक्के आहे. हे तरुणांमध्ये चिंतेचे प्रमुख कारण असल्याचे मतही डॉ. मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केले. ॲड. अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. भाजपकडून लोकशाही आणि संविधानाला असलेला धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, अस प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीयावेळी केले.
लाखो नोकऱ्यापदवीधर आणि तरुणांसाठीच्या जाहीरनाम्यामागील आपले व्हिजन सांगताना परब म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच सर्व वचने पूर्ण करणार आहोत. आम्ही मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रदेखील स्थापन करू. त्यातून पदवीधर आणि तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होतील. तरुणांसाठी नोकरीच्या संधींसाठी आम्ही लढत राहू.
जाहीरनाम्यातील आश्वासने• मुंबई उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची शाखा स्थापन करणार.• व्हिसा, पासपोर्ट प्रक्रिया, परदेशीशैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश यासंदर्भात 'हेल्प डेस्क'ची स्थापना.• पदवीधरांसाठी वार्षिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोजगार आणि शैक्षणिक मेळावा आयोजित करणार.मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काच्या घरांसाठी अशासकीयविधेयक सादर करणार.