अलिबाग : आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.रायगड जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व ९१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून, ६ आॅगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट ते आॅक्टोबर दरम्यान संपणार आहे. या निवडणुकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूकही घेण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिसूचना ४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ जुलै ते २० जुलैदरम्यान उमेदवारांना नामनिर्देशपत्र भरण्याची मुदत आहे. २१ जुलै रोजी नामनिर्देशपत्रांची छाननी करण्यात येईल, २३ जुलै रोजी नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत असून, याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ४ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. तर ६ आॅगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती :पेण - बार्झे, काळेश्री. माणगाव - माणगाव, टेमपाले. पनवेल - तरघर, उसर्ली खुर्द, वलप, खैरवाडी, केवाळे, हरिग्राम, उमरोली, पिसार्वे, पाले बुद्रुक, आपटे, देवळोली बुद्रुक, पालीदेवद, वारदोली, आकुर्ली, खानाव. महाड - बिरवाडी, आसनपोई, मांडले, भेलोशी, नरवण.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
By admin | Published: June 27, 2015 10:57 PM