जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी

By admin | Published: July 11, 2015 10:46 PM2015-07-11T22:46:00+5:302015-07-11T22:46:00+5:30

महाड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तर ४३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी, महाड यांनी जाहीर केला आहे

Gram Panchayat elections are started in the district | जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी

Next

दासगाव : महाड तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तर ४३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी, महाड यांनी जाहीर केला आहे. या पाच ग्रामपंचायतींमध्ये बिरवाडी, आनपोई, मांडले, भेलोशी, नरवण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४ आॅगस्ट २०१५ रोजी या निवडणुका होणार आहेत.
महाड तालुक्यातील बिरवाडी, आसनपोई, मांडले, नरवन, भेलोशी या ग्रामपंचायतींचा कार्यक्रम संपत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील वीर, वारंगी, चांढवे खु, पिंपळवाडी, चापगाव, वाळसुरे, उंदेरी, आढी, पणदेरी, आंबोशिवथर, कुंभेशिवथर, काचले, बावले, लाडवली, वाळण खु, निगडे, बारसगाव, तळोशी, कोतुर्डे, वाळण बु, दहीवड, पडवी, सांदोशी, कोकरे तर्फे नाते, पांगारी, शेल, आकले, रुपवली, वरंडोली, कोंझर, फाळकेवाडी, पिंपळकोंड, चिंभावे मोहल्ला, दादली, अप्पर तुडील, राजेवाडी, कुर्ले, घावरेकोंड, तेलंगे मोहल्ला, तेलंगे, आदीस्ते, शिरसवने, मुमुर्शी या गावांमध्ये काही जागांकरिता पोटनिवडणूक होणार आहे.
महाड तहसीलदारांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १३ ते २० जुलैपर्यंत नामनिर्देशपत्र भरणे, २१ जुलै रोजी नामनिर्देशन छाननी करणे, २३ जुलै रोजी नामनिर्देशन मागे घेणे याच दिवशी निवडणूक चिन्ह देणे तसेच उमेदवारांची यादी तयार करणे आणि ४ आॅगस्ट, २०१५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ६ आॅगस्ट, २०१५ रोजी मतमोजणीचा कार्यक्रम महाड तहसील कार्यालयातच होणार असल्याची माहिती महाड तहसीलदारांनी दिली आहे.
नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भरून त्याची प्रिंट काढून ही प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावयाची आहे. (वार्ताहर)

Web Title: Gram Panchayat elections are started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.