अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु वात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सरपंच आणि सदस्य पदासाठी एकूण सहा अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोठ्या सभा घेण्यापेक्षा मतदारांच्या घरी जाऊन थेट त्यांची भेट घेण्यावर भर देण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे.मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाºया तसेच नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील २५, मुरु ड तीन, पेण पाच, पनवेल दोन, उरण एक, कर्जत आठ, माणगाव दहा, तळा पाच, रोहा सहा, महाड १७, श्रीवर्धन चार, म्हसळा चार अशा एकूण ९० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सोमवारी ४ फेब्रुवारीपासून सुरु वात झाली. पहिल्याच दिवशी सरपंच आणि सदस्य पदासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यात अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक, रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक, पेण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एक असे एकूण तीन तसेच रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी एकूण तीन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले.अर्ज भरण्याची मुदत शनिवारी ९ फेब्रुवारीपर्यंत आहे. सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशन अर्जाची छाननी करणे, बुधवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेणे. त्यानंतर निवडणूक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, तर २५ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.कांदळे सरपंचपदासाठी पहिल्या दिवशी एक अर्जपेण : पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींसाठी २४ फेबुु्रवारी रोजी मतदान होत असून त्यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी ९ फेब्रुवारी रोजी उमेदवारी भरण्याची अंतिम मुदत असल्याने फेब्रुवारीच्या या आठवड्यात सर्व राजकीय पक्षांचे सरपंच व सदस्य पदाचे उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम सुरू राहणार आहे.सोमवार पहिल्या दिवशी कांदळे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी राकेश भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन रोकडे यांच्याकडे सादर केला. याप्रसंगी सामाजिक कार्यक र्ते गणेश म्हात्रे, अविनाश म्हात्रे, रोडेचे माजी सरपंच जनार्दन पाटील, राकेश व संग्राम लांगी, नीलेश पाटील आदी उपस्थित होते. या एकमेव अर्जाशिवाय अन्य कोणतेही ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.पेणमधील २४ फेब्रुवारी रोजी कांदळे, उंबर्डे, वढाव, शिर्की व शिहू या पाच ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सरपंच पदाच्या पाच जागांशिवाय एकूण २५ प्रभागातील ६८ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीचा राजकीय रंगढंग पाहता वाशी वडखळ टप्प्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये वढाव, उंबर्डे, कांदळे व शिर्की या ग्रामपंचायतींचा समावेश असून शिहू विभागातील एकमेव शिकू ग्रामपंचायत आहे. राजकीय बलाबल पाहता या सर्व ग्रामपंचायतींवर काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. शेकापला सद्यस्थितीत या पाचही ग्रामपंचायतीवर कब्जा मिळविताना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. या राजकीय आखाड्यात पुढील पाच सहा दिवसात कोण कोणाच्या बाजूने राजकीय समीकरणे जुळवेल यावरच राजकीय चित्र स्पष्ट दिसणार आहे.कर्जतमध्ये एकही नामनिर्देशपत्र नाही१कर्जत : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्या आहेत. आज नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशपत्र दाखल झाले नाही.२मार्च २०१९ मध्ये आठ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तालुक्यातील भालीवडी, हालीवली, ममदापूर, पळसदरी, खांडपे, चिंचवली, किरवली, सावेळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.३सोमवारी पहिल्या दिवशी ग्रामपंचायतीसाठी एकही नामनिर्देशपत्र दाखल झाले नाही अशी माहिती येथील तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : ९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्याच दिवशी फक्त सहा उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:14 AM