Join us

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर;भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

By मुकेश चव्हाण | Published: December 11, 2020 5:00 PM

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका झाल्या. यानंतर आता राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनूसार, 15 जानेवारी 2021 ला राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र नुकत्याच सुरळीत झालेल्या पदवीधर निवडणुकांनंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकाचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम असा-

  • निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : 15 डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : 23 ते 30 डिसेंबर
  • उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
  • उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप : 4 जानेवारी
  • मतदान : 15 जानेवारी (सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच)
  • मतमोजणी : 18 जानेवारी
  • निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्धी : 21 जानेवारीपर्यंत
टॅग्स :ग्राम पंचायतनिवडणूकमहाराष्ट्रभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी