कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमणही ग्रामपंचायत सदस्यांना भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:12 AM2018-09-21T05:12:43+5:302018-09-21T05:12:45+5:30

ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीही त्याच गावातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर त्यामुळे संबंधित सदस्य अपात्र ठरतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Gram panchayat members will encroach on family commitments! | कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमणही ग्रामपंचायत सदस्यांना भोवणार!

कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमणही ग्रामपंचायत सदस्यांना भोवणार!

googlenewsNext

मुंबई : ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीही त्याच गावातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर त्यामुळे संबंधित सदस्य अपात्र ठरतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे अपात्रता टाळण्यासाठी वापरली जाणारी पळवाट बंद झाली आहे.
अमरावती तालुक्यातील कळंबा (महाली) येथील ग्रामपंचायत सदस्या जनाबाई काशिराम गायकवाड यांनी केलेले अपील फेटाळताना सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. जनाबाई यांच्या पती व सासऱ्याने गावातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. गावातील संजय भानुदास, संभाजी अमृता व काशिनाथ तुळशीदास वैद्य या नागरिकांनी तक्रार केल्यावर आधी अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांनी व नंतर विभागीय आयुक्तांनी जनाबाई यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविले. नागपूर खंडपीठानेही (न्या. झेड. ए. हक) हा निर्णय कायम केल्याने जनाबार्इंनी त्याविरुद्ध अपील केले होते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात सन २००६ मध्ये १४(१)(जे-३) हे नवे कलम अंतर्भूत करून सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेची तरतूद केली गेली. जनाबाई यांच्या अपिलावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने या अपात्रता तरतुदीचा पूर्वीहून अधिक व्यापक अर्थ लावला. हे करत असताना न्यायालयाने अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गावाचे सरपंच सागर पांडुरंग धुंडारे यांच्या अपिलात गेल्या १३ नोव्हेंबर रोजी स्वत:च (न्या. कुरियन जोसेफ व न्या. आर. भानुमती) दिलेला निकाल चुकीचा ठरवून फिरविला.
>इतरांनाही बसणार फटका
हा ताजा निकाल ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेसंबंधी दिला गेला असला तरी नगरपालिका व महापालिका या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनाही त्याचा फटका बसेल. याचे कारण असे की, सन २००६ मध्ये अपात्रतेची ही तरतूद ग्रामपंचायतींसोबत नगरपालिका व महापालिकांसाठीही एकाच वेळी करण्यात आली. तेथेही कायद्याची भाषा तंतोतंत अशीच आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºया पालिका व महालिका सदस्यांची प्रकरणे यापुढे जेव्हा न्यायालयात येतील त्यांचा निकाल आताचा या निकालाच्या आधारेच होईल.
>निकालाचा नेमका परिणाम
स्वत: अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य अपात्र.
कुटुंबीयांनी केलेल्या जागेत राहणारा सदस्यही अपात्र.
हेच तत्त्व भाड्याच्या जागेलाही लागू. मालकाने अतिक्रमण करून बांधलेल्या घरात राहणारा सदस्यही अपात्र.
अतिक्रमण सदस्यत्वाच्या काळात झालेले असण्याची गरज नाही. आधीपासून झालेल्या अतिक्रमणानेही अपात्रता लागू.
अतिक्रमण कायम असेल तोपर्यंत ते करणाºयांच्या वारसांनाही अपात्रता लागू.
महिला सदस्याच्या
विवाहापूर्वी झालेले
अतिक्रमण असेल तरी
तिला अपात्रता लागू.

Web Title: Gram panchayat members will encroach on family commitments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.