Join us  

ग्रामपंचायत देणार लॅपटॉप

By admin | Published: June 20, 2014 12:07 AM

दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये ज्या विद्याथ्र्यानी 9क् टक्के गुण संपादन केले आहेत

नवी मुंबई : दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये ज्या विद्याथ्र्यानी 9क् टक्के गुण संपादन केले आहेत त्या विद्याथ्र्याना मोफत लॅपटॉप देण्याचा स्तुत्य उपक्रम खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणार आहे. याचे सर्वच ठिकाणाहून कौतुक होत आहे.
विद्याथ्र्यानी मिळवलेल्या  या यशाबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचे युग हे कॉम्प्युटरचे आहे. त्यामुळे मुलांना  कॉम्प्युटरचे ज्ञान असणो आवश्यक आहे. आणि आता सध्या शाळांमधूनच लहानपणापासूनच कॉम्प्युटरचे धडे देण्यास सुरुवात होते. त्यामुळे दहावीनंतर तर मुलांना याचा दररोज वापर करावा लागतो. दहावी, बारावीनंतर या विद्याथ्र्याना अनेक स्पर्धापरीक्षांना सामोरे जावे लागते. आणि यासाठी इंटरनेटचा मोठय़ाप्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय दररोज असाईनमेंट्स तसेच प्रेङोंटेशनसाठी कॉम्प्युटरचाच वापर केला जातो. मात्र ज्या विद्याथ्र्याकडे कॉम्प्युटर नाही अशा विद्याथ्र्याना सायबरचा आधार घ्यावा लागतो. आणि प्रत्येकाला हे परवडेल असे नाही. आणि मुलांचा वेळ आणि खर्च वाचावा याच हेतूने असे उपक्रम राबविणो फार गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने  मुलांच्या हिताचा असा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी विद्याथ्र्यानी ग्रामपंचायतीमध्ये आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच विनता पाटील यांनी केले आहे. तसेच गरीब व गरजू विद्याथ्यार्ंना गणवेश व वह्यांचे वाटप देखील पंचायतीकडून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)