ग्रँड रोडचा पूल वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 04:29 PM2018-07-04T16:29:05+5:302018-07-04T16:32:25+5:30
मुंबई पोलिसांनी केले ट्वीट
मुंबई - अंधेरीतील गोखले पूल दुर्घटना घडून 24 तासही उलटले नसताना ग्रँटरोडमधील पुलाला तडे गेल्याचा प्रकार समोर आला होता. याबद्दलची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचून खबरदारीचा पावले उचलली आहेत. त्यानंतर या पुलावरील वाहतूक अन्य मार्गांवरुन वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर या पुलाच्या तपासणीचं काम पूर्ण करून ग्रँट रोडचा पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे.
Grant road bridge is now open for traffic.
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 4, 2018
ग्रँटरोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या पुलाला तडे गेल्याचं आज सकाळी निदर्शनास आलं. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरील वाहतूक केनडी पुलावरुन वळवण्यात आली होती. अग्निशमल दल, पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचून खबरदारीचा पावले उचलल्यानंतर आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.