Join us

निवृत्तीचे वय वाढल्याचा जीआर बनावट

By admin | Published: May 10, 2017 2:46 AM

क वर्ग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आल्याचा बनावट शासन निर्णय (जीआर) तयार करून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : क वर्ग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आल्याचा बनावट शासन निर्णय (जीआर) तयार करून, तो सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल करण्यात आला आहे. हा जीआर बनावट असल्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज काढले. राज्य शासकीय सेवेतील ड वर्ग कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे इतके आहे. त्या धर्तीवर आता क वर्ग कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयही ६० वर्षे करण्यात आल्याचे बनावट जीआरमध्ये म्हटले आहे. गट क संवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांची वयाच्या ५८ वर्षांपर्यंत ३३ वर्षांपेक्षा कमी सेवा होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आल्याचे या बनावट जीआरमध्ये म्हटले आहे. तथापि, ते चुकीचे असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.