ग्रंथालीचा ग्लोबल साहित्यसफर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:06 AM2021-04-10T04:06:52+5:302021-04-10T04:06:52+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘साहित्याच्या पारावर’ या साप्ताहिक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केल्यानंतर, आता ‘ग्लोबल साहित्यसफर’ हा नवा उपक्रम ...

Granthali's Global Literary Journey | ग्रंथालीचा ग्लोबल साहित्यसफर उपक्रम

ग्रंथालीचा ग्लोबल साहित्यसफर उपक्रम

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘साहित्याच्या पारावर’ या साप्ताहिक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केल्यानंतर, आता ‘ग्लोबल साहित्यसफर’ हा नवा उपक्रम ‘ग्रंथाली’तर्फे डिजिटल माध्यमातून यूट्युब चॅनेलवर सुरू होत आहे. या उपक्रमात राजीव श्रीखंडे एका अभिजात जागतिक पुस्तकाची ओळख करून देणार आहेत. यात इंग्रजीसह विविध देशांतील उत्कृष्ट साहित्यकृतीचा परिचय ते करून देतील. हा कार्यक्रम दर महिन्याला दुसऱ्या व चौथ्या शनिवारी प्रसारित हाेईल. १० एप्रिल रोजी याचा पहिला भाग संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होईल, तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी ‘पायाला भिंगरी’ हे नवीन सदर या चॅनलवर सुरू करण्यात येईल. यात मेधा आलकरी जगभरातल्या विविध स्थळांची अनोखी माहिती मांडणार आहेत. ‘ग्रंथाली वॉच’ या यूट्युब चॅनलवरून हे कार्यक्रम प्रसारित होतील.

-------------------------------

Web Title: Granthali's Global Literary Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.