भाषाविषयक संशोधन व संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:31 AM2018-05-14T03:31:34+5:302018-05-14T03:31:34+5:30

मराठी भाषेच्या विकासाकरिता या भाषेविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. काळानुरूप होणा-या बदलांचा आढावा घेतला की, त्याची भाषेच्या प्रगतीसाठी मदत होते

Grants to Language Research and Promotional Institutions | भाषाविषयक संशोधन व संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान

भाषाविषयक संशोधन व संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान

Next

मुंबई : मराठी भाषेच्या विकासाकरिता या भाषेविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. काळानुरूप होणाºया बदलांचा आढावा घेतला की, त्याची भाषेच्या प्रगतीसाठी मदत होते. त्यामुळे राज्य मराठी विकास संस्थेने यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला असून यंदाच्या वर्षीपासून मराठी भाषाविषयक संशोधन आणि संवर्धन करणाºया संस्थांना अनुदान दिले जाणार आहे.
या अनुदानासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडे एकूण ५५ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १४ संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. या अनुदानांतर्गत प्रत्येकी संस्थांना पाच लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल. अनुदानासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून, त्यातून १४ संस्थांची अनुदानासाठी निवड करण्यात आली. या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मंजुरीची पत्रे पाठवण्यात येतील. त्याची प्रक्रिया सुरू असून, हे अनुदान २०१७-२०१८ या वर्षातील आहे. अनुदान मंजूर झालेल्या संस्थांमध्ये कोल्हापूरची हलकर्णी येथील भाषा विकास संशोधन संस्था, दादर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, अनुवाद सुविधा केंद्र, धुळेची आय. व्हि. के. राजवाडे संशोधन मंडळ, दादरचे मराठी संशोधन मंडळ, नागपूरचे विदर्भ संशोधन मंडळ, पुण्याचे मराठी अभ्यास परिषद, पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तोजक संस्था, धुळेची का. स. वाणी, मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुवेतील श्री समर्थ वाग्देवता मंदिर, पुण्यातील श्री शिवाजी रायगड स्मारक, पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ, वाईतील प्रज्ञापाठ शाळा मंडळ, अंबाजोगाईतील दासोपंत संशोधन मंडळ, नागपूरचे साहित्य विहार आदींचा समावेश आहे.

Web Title: Grants to Language Research and Promotional Institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.