राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० नवे रुग्ण, ६७६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:43+5:302021-04-25T04:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असून दैनंदिन रुग्ण व मृत्यूंच्या संख्येचा आलेख चढताच ...

The graph of daily patients in the state rises; 67 thousand 160 new patients, 676 deaths | राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० नवे रुग्ण, ६७६ मृत्यू

राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० नवे रुग्ण, ६७६ मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असून दैनंदिन रुग्ण व मृत्यूंच्या संख्येचा आलेख चढताच आहे. राज्यात शनिवारी ६७ हजार १६० रुग्णांची नोंद झाली असून ६७६ मृत्यू झाले. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ एवढी झाली असून मृत्यूंचा आकडा ६३ हजार ९२८ इतका आहे. सध्या राज्यात ६ लाख ९४ हजार ४८० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात दिवसभरात ६३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के झाले असून मृत्यूदर १.५१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५४ लाख ६० हजार ८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.६१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४१ लाख ८७ हजार ६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार २४६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. शनिवारी नोंद झालेल्या ६७६ मृत्यूंपैकी ३९६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर २८० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

* राज्यात ६० हजार, तर मुंबईत ९ हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्यात ७६,३०० ऑक्सिजन खाटा उपलब्ध आहेत. २५,००० पेक्षा अधिक अतिदक्षता खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याला दररोज १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. ३०० ते ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन राज्याबाहेरून आणला जात आहे. मुंबईतही ऑक्सिजनवरील रुग्णांचा आकडा वाढला असून गुरुवारपर्यंत ९९२० रुग्ण ऑक्सिजनवर होते. मुंबईत एकूण १०,७७३ ऑक्सिजन खाटा असून त्यापैकी ८५३ रिक्त आहेत, तर २८३४ अतिदक्षता खाटा असून त्यापैकी २७९२ आरक्षित आहेत, तर ४२ खाटा रिक्त आहेत.

..............................

सक्रिय रुग्ण संख्या

पुणे १ लाख ८ हजार २३१

ठाणे ८० हजार ४९२

नागपूर ८० हजार ०८७

मुंबई ७८ हजार २२६

नाशिक ४२ हजार ३८१

Web Title: The graph of daily patients in the state rises; 67 thousand 160 new patients, 676 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.