राज्यात रुग्णवाढीचा आलेख चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:18+5:302021-05-01T04:06:18+5:30
मुंबई : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी नव्या बाधितांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. ...
मुंबई : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी नव्या बाधितांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. रोजच्या नव्या बाधितांचे प्रमाण ६० हजारांच्या घरात आहे. शुक्रवारी दिवसभरात ६२ हजार ९१९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर मृतांची संख्या ८२८ इतकी आहे.
आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४६ लाख २ हजार ४७२ इतकी झाली आहे, तर दिवसभरात ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ३८ लाख ६८ हजार ९७६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ६२ हजार ६४० इतकी आहे. आजच्या ८२८ कोरोनाबाधितांच्या मृत्यूने बळी पडलेल्यांची एकूण संख्या ६८ हजार ८१३ इतकी झाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७१ लाख ६ हजार २८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६ लाख २ हजार ४७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ९३ हजार ६८६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २६ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.