श्री सदगुरुंना कृतज्ञतापूर्वक आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:09+5:302021-05-29T04:06:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जीवनविद्यारुपी तत्वज्ञानाचे निर्माते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या ९व्या पुण्यस्मरण दिनी, श्री सदगुरुंना कृतज्ञतापूर्वक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीवनविद्यारुपी तत्वज्ञानाचे निर्माते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या ९व्या पुण्यस्मरण दिनी, श्री सदगुरुंना कृतज्ञतापूर्वक आदरांजली व्यक्त आणि स्मरण पुण्यस्वरूप करण्यासाठी २९ मे रोजी रात्री ७.३० ते ९ या वेळेत जीवन विद्या या यू ट्युब वाहिनीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोगत विश्वप्रार्थनेचे, संगीत जीवनविद्या, नामधारकांची मनोगते, ई-दीपस्तंभाचे प्रकाशन, सद्गुरु आधार / ध्वनिचित्रफीत, आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद दादांचे मार्गदर्शन आणि भैरवी अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे, असे जीवनविद्या मिशनच्या विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले. आरोग्य तनाचे आणि मनाचे सुधारणारी, जीवनाचे भले, कल्याण, प्रसंगी रक्षण करणारी, चांगल्या बुद्धीसोबतच सुख, आनंद, ऐश्वर्याचा वर्षाव करणारी अशी विश्वप्रार्थना आहे. आज याच विश्वप्रार्थनेचा जप करत मनाच्या आरोग्यासोबतच शरीराचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न आपण सर्वच करत आहोत. अगदी जगामध्ये विश्वप्रार्थनेचा जप केला जातो आहे, असेही मंडळाकडून सांगण्यात आले.
....................................