Dharavi : मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट; मातीचे किल्ले, नक्षीदार पणत्यांना मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:04 AM2021-10-26T06:04:30+5:302021-10-26T06:04:57+5:30

Dharavi : यंदा दिवाळीच्या आधीच सरकारने निर्बंध शिथिल केल्याने धारावीच्या कुंभारवाड्यात दिवाळीचा झगमगाट दिसून येत असून, व्यापारी सुखावले आहेत.

Great demand for unique sparklers, earthen forts, ornate pottery at Dharavi's Kumbharwada in Mumbai this year pdc | Dharavi : मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट; मातीचे किल्ले, नक्षीदार पणत्यांना मोठी मागणी

Dharavi : मुंबईतील धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा अनोखा झगमगाट; मातीचे किल्ले, नक्षीदार पणत्यांना मोठी मागणी

googlenewsNext

- ओंकार गावंड

मुंबई : नक्षीदार पणत्या, रंगरंगोटी केलेले दिवे, लाल माती, मातीचे किल्ले या सर्व आकर्षक वस्तूंनी धारावीचा कुंभारवाडा गजबजला असून, दिवाळीच्या खरेदीसाठी येथे व्यापाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात येथे कोट्यवधींची उलाढाल होते.

यंदा दिवाळीच्या आधीच सरकारने निर्बंध शिथिल केल्याने धारावीच्या कुंभारवाड्यात दिवाळीचा झगमगाट दिसून येत असून, व्यापारी सुखावले आहेत. कुंभारवाड्यात इतर राज्यांतून रंगरंगोटीसाठी येणाऱ्या वस्तूंचीदेखील आयात वाढली आहे. यंदा दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली जाणार असल्याने विविध भागांतून व्यापारी येथे पणत्या खरेदी करण्यासाठी येत असल्याने कुंभारवाड्यात गर्दी पाहायला मिळत आहे.

किल्ले खरेदीला लहानग्यांची गर्दीकालानुरूप किल्ले बांधण्यापेक्षा रेडिमेड किल्ले खरेदी करण्याकडे मुलांसह पालकवर्गाची पसंती वाढली आहे. त्यामुळे बाजारात रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, शिवनेरी अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी लहानगे गर्दी करत आहेत. वेगवेगळ्या साईजनुसार ७० ते १००० रुपयांपर्यतचे दर वेगवेगळ्या किल्ल्यांचे आहेत. 

व्यवसायाची अपेक्षा
यंदा धारावीतील प्रत्येक व्यापाऱ्याला ४ ते ५ लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित असून, संपूर्ण कुंभारवाड्यात आठ ते दहा कोटींची उलाढाल होऊ शकते, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा डायमंड पणत्यांचे विशेष आकर्षण
धारावीच्या कुंभारवाड्यात यंदा सजवलेल्या पणत्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे यंदा परराज्यातून तयार करून आलेल्या आणि कुंभारवाड्यात बनविलेल्या पणत्यांवर सजावट करण्यात येत आहे. होलसेल दरात या पणत्या १०० रुपये डझन आणि जोडी घ्यायची असल्यास ४० रुपये जोडी या दराने विकण्यात येत आहेत.

किल्ले खरेदीला लहानग्यांची गर्दी
कोल्हापूर :  लानुरूप किल्ले बांधण्यापेक्षा रेडिमेड किल्ले खरेदी करण्याकडे मुलांसह पालकवर्गाची पसंती वाढली आहे. त्यामुळे बाजारात रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, शिवनेरी अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी लहानगे गर्दी करत आहेत. वेगवेगळ्या साईजनुसार ७० ते १००० रुपयांपर्यतचे दर वेगवेगळ्या किल्ल्यांचे आहेत. 

पणत्या तयार करणे हे अंगमेहनतीचे काम आहे. माती पायांनी तुडवणे, पणत्यांना आकार देणे, उन्हात वाळविणे, भट्टीत तापविणे यासाठी कामगारांची गरज भासते. या मेहनतीच्या बदल्यात मोबदला अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी वाढीव किमतीत पणत्या खरेदी करण्यास तयार होत नाहीत.
- दाऊद शेख, व्यापारी

ठाणे, कल्याण, रायगड येथील व्यापाऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात पणत्या खरेदी केल्या आहेत. माझ्याकडून आतापर्यंत ५ हजार पणत्यांची विक्री झाली आहे. यंदा किल्ल्यांनादेखील मागणी आहे. पुढील काळात २० ते २५ हजार पणत्या विकल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
- अनिता जेठवा, व्यापारी
 

Web Title: Great demand for unique sparklers, earthen forts, ornate pottery at Dharavi's Kumbharwada in Mumbai this year pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.