Join us

महामानवाला महाभिवादन!

By admin | Published: December 07, 2014 1:57 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांमुळे येथील परिसराला भीमसागराचे स्वरूप आले होते.

मुंबई : खाद्यांवर निळा ङोंडा, डोक्यावर निळी टोपी, खिशाला महामानवाची प्रतिमा असलेला बिल्ला आणि शुभ्र वस्त्रे परिधान करीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांमुळे येथील परिसराला भीमसागराचे स्वरूप आले होते.
देशभरातून लाखो अनुयायी शुक्रवारपासूनच मुंबईत धडकू लागले. शुक्रवारच्या सूर्योदयानंतर येथे येणा:या अनुयायांच्या संख्येत लाखोंची भर पडली. शनिवारी जसजसा सूर्य वर चढू लागला तसतसे येथील गर्दीचे रूपांतर महासागरात होऊ लागले. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीर्पयतचे सर्वच रस्ते अनुयायांनी भरून गेले.
गेल्या दोन दिवसांत सुमारे सात ते आठ लाख अनुयायांनी चैत्यभूमी परिसराला भेट दिली़ दादर व शिवाजी पार्क परिसरात जनजागृती मोहीम उघडली होती.  यात नसबंदी, स्त्रीभ्रृण हत्या, व्यसनमुक्ती, आरोग्याविषयीचे माहितीफलक लावले होत़े शैक्षणिक मार्गदर्शनाची जबाबदारीही काही स्वयंसेवी संस्थांनी उचलली होती़ यात दहावी-बारावी, त्यानंतर व्यावसायिक मार्गदर्शनही अनुयायांना मोफत देण्यात येत होत़े तर शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे माहिती कक्ष उभारला होता़ (प्रतिनिधी)
 
स्वच्छता अभियान
पालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता अभियानामुळे शिवाजी पार्कवर चारशे सफाई कामगार तैनात केले होत़े कच:याची गाडी अधूनमधून मैदानात फिरून एका ठिकाणी साठवलेला कचरा उचलून नेत होती़ तर कामगारही सतत मैदानात सफाई करीत फिरत होत़े त्याच दरम्यान कच:याचा ढीग साठल्याचा दूरध्वनी येताच अधिकारी कामगारांचा ताफा त्या ठिकाणी तातडीने पाठवत होत़े
 
1महामानवाला अभिवादन करण्यासाठी नाक्यानाक्यावर लावण्यात आलेले फलक आणि फलकांवरील शांतीचा संदेश देणारे शब्द येथील वैचारिक वातावरणात भर घालत होते. अनुयायांनी भरभरून येणारी वाहने गर्दीचे रूपांतर महासागरात करीत होती. 
2महिला, पुरुष, मुले आणि वृद्ध अनुयायांची चैत्यभूमीकडील ओढ सूर्यास्तार्पयत उत्तरोत्तर वाढतच होती. जसा सूर्य डोक्यावर येत गेला तसे येथे उतरणा:या गर्दीत उत्तरोत्तर भरच पडत गेली. 
3कसारा, कजर्त आणि विरारहून दादर रेल्वे स्थानकावर येणा:या लोकल अनुयायांनी भरभरून येत होत्या. या लोकलमधून दादर रेल्वे स्थानकावर उतरणा:या अनुयायांकडून महामानवाच्या नावाचा जयघोष सुरू होता.
 
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मान्यता दिल्याचे वक्तव्य शुक्रवारी केले आहे. याबाबतच्या कायदेशीर तरतुदी लवकरच पूर्ण केल्या जातील. केंद्र व राज्य सरकार मिळून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभे करू. लाखो भीमसैनिक डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येथे जमले आहेत. राज्य शासनाच्या वतीने इतिहासात प्रथमच घटनेच्या या शिल्पकारांना शासकीय मानवंदना देण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होता आले, हे माङो भाग्यच. बाबासाहेबांचा समतेचा संदेश घेऊन त्यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच आपणा सर्वाना पुढे जायचे आहे.
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
 
च्बाबासाहेबांवर आधारित व त्यांनी लिहिलेली पुस्तके घेण्यासाठी स्टॉल्सवर गर्दी जमली होती.
च्अनुयायांना आराम करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
च्दुपारच्या वेळी अनेक अनुयायी येथील वृक्षांच्या सावलीत आराम करताना दिसत होते.
च्पथनाटय़ाद्वारे गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत होते.
च्महामानवाला अभिवादन करण्यासाठी संघटनांच्या वतीने गाणी सादर करण्यात येत होती.
च्गाणी, पथनाटय़े, अन्नछत्र दानासह पाण्याचे स्टॉल अशांनी चैत्यभूमी फुलून गेली होती.
च्अनुयायांनी येथील बाजारपेठांतील खरेदीसाठीदेखील मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.
च्फेरीवाल्यांनी येथे बस्तान बसविले नसल्याने सहजरीत्या चैत्यभूमी गाठता येत होती.