मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 07:03 PM2018-12-10T19:03:54+5:302018-12-10T19:05:05+5:30

सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे.

Great relief to Maratha community, temporary refusal of court to adjourned the Maratha reservation | मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार

मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार

Next

मुंबई - मराठा आरक्षणाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर स्थगिती देण्यास आजही मुंबईउच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी 18 डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का, या प्रश्नावर मंथन सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निकाल देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, आजच राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यानुसार, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात नकार दिला आहे. 
Maratha Reservation: जिवे मारण्याच्या धमकीबद्दल सांगत असतानाच अॅड. सदावर्तेंवर हल्ला

तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी घेण्यात येईल, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण झाल्यामुळे न्यायालयाबाहेर तणावाचे वातावरण बनले होते. तर समाजाच्या वतीने मी शेवटपर्यंत लढणार आहे, कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. आज न्यायालयाने आपल्याला मोठा दिलासा दिला आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे. 
 

Web Title: Great relief to Maratha community, temporary refusal of court to adjourned the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.