ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:29 AM2020-03-31T01:29:10+5:302020-03-31T01:29:25+5:30

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निबंर्धांचे पालन करणे आवश्यक आहे.

Greater risk of infection to the elderly; Guidelines released by the Ministry of Health | ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

googlenewsNext

मुंबई : राज्यातील कोरोनाची दहशत दिवसागणिक वाढतेय. एकाबाजूला रुग्णांचे निदान वाढते आहे, तर दुसरीकडे मृत्यूंची संख्याही दहावर गेली आहे. या मृत्यूंमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निबंर्धांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संसगार्चा ज्येष्ठांना असलेला अधिक धोका टाळण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसगार्पासून दूर राहावे लागणार आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांकरिता मार्गदर्शक सूचना-हे करा

च्घरीच रहा. घरी येणा?्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना

किमान एक मीटरचे अंतर राखा.

च्थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा.

च्खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर रूमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर झाकणबंद असलेल्या कचरा डब्यात टाका.

च्घरी बनविलेला ताजा आणि पोषक आहार घ्या, या आहारातून आपल्या कुटुंबाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार भरपूर पाणी प्या. शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस प्या.

च्व्यायाम, प्राणायाम करा. आपल्याला असलेली पथ्ये पाळा. डॉक्टरांनी दररोज घ्यायला सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घ्या.

च्दूर राहत असलेले आपले कुटुंबीय, नातेवाईकांबरोबर कॉल अथवा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधा, गरज पडल्यास त्यासाठी कुटुंबियांची मदत घ्या.

च्मोतीबिंदू किंवा गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया जर आधीच ठरल्या असतील तर त्या शस्त्रक्रिया काही काळासाठी पुढे ढकला.
च्वारंवार स्पर्श केल्या जाणा?्या सर्व ठिकाणांना जंतुनाशकाचा वापर करून पाण्याने नियमित स्वच्छ करा.

Web Title: Greater risk of infection to the elderly; Guidelines released by the Ministry of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.