नितीन जगताप लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांत मिरचीची आवक कमी झाली असून, त्यामुळे मिरचीचे दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव वाढले होते, पण आता आवक वाढली असून, प्रतिजुडी १०ते ३० रुपयांनी कमी झाले आहेत, तर किराणा माल आणि फळांचे भाव स्थिर आहेत.
सणासुदीला विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे किराणा मालाची मागणी वाढते. कोरोना काळात अनेकांच्या खिशाला झळ बसली आहे. त्यामुळे ग्राहक गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदी कमी करत आहेत. मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. पावसामुळे या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली होती. आता परिस्थिती सुधारली असून, भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली, तर दुसरीकडे मिरचीची आवक कमी झाली असून, टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे.
पालक, मेथी १० ते २० रु कोथिंबीर १०, मेथी २०, लालमाठ १०, शेपू १०, पालक १० रुपये जुडी मिळत आहे, तर फरसबी १००, वाल ८० रुपये किलो मिळत आहे. कांद्याच्या पातीची आवक घटली असून, कांद्याची पात मिळत नाही. शेवगा १००, पडवळ, तोंडली ८०, मिरची २०० किलो दराने मिळत आहे.
फळांचे दर स्थिरभाज्यांचे दर कमी झाले असले तरी फळांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत फळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
शेवगा १२० रूटोमॅटोच्या दरात घसरण झाली असून, ८० रुपये किलो असणारे टोमॅटो आता ५० रुपये किलो मिळत आहेत. ग्राहकांमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ४० टक्के घट आहे. ग्राहक घटल्याने उप्तनात फरक पडला आहे.
टोमॅटोच्या दरात घसरण झाली असून, ८० रुपये किलो असणारे टोमॅटो आता ५० रुपये किलो मिळत आहेत. ग्राहकांमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ४० टक्के घट आहे. ग्राहक घटल्याने उप्तनात फरक पडला आहे.
ग्राहकांची गर्दी कमी होती, पण या आठवड्यात दिवाळी असल्याने ग्राहकांमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ४० टक्के घट आहे.- अभय भोसले, व्यापारी
सण साजरा करायला हवा. सर्व कुटुंबाला दिवाळीचा आनंद घेता आला पाहिजे. खर्च वाढला असला, तरी काटकसर करून दिवाळी साजरी करू. - अस्मिता गवळी, ग्राहक