वरळीच्या गणेशोत्सवात ‘ग्रीन कॉरिडोअर’
By Admin | Published: September 24, 2015 01:00 AM2015-09-24T01:00:49+5:302015-09-24T01:00:49+5:30
तब्बल ४७ वर्षांनी मुंबईत ४ आॅगस्ट रोजी पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यावेळी हृदय लवकर रुग्णालयात पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर केला होता
मुंबई : तब्बल ४७ वर्षांनी मुंबईत ४ आॅगस्ट रोजी पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यावेळी हृदय लवकर रुग्णालयात पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर केला होता. याच घटनेवर वरळीतील आंबेडकर नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखावा उभा केला आहे.
मुंबईत आॅगस्ट महिन्यात झालेल्या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे ‘ग्रीन कॉरिडोअर’ हा शब्द सर्वच मुंबईकरांना माहीत
झाला. पण प्रत्यक्षात ग्रीन
कॉरिडोअर म्हणजे काय, हे अनेकांना पाहता आले नाही. हृदय कमी
वेळेत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पोहचवण्यासाठी
ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा केला जातो. याला ग्रीन कॉरिडोअर असे म्हणतात. हाच देखावा मंडळाने उभारला आहे.
रुग्णांचे अवयव निकामी झाल्यावर त्यांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अवयवदात्यांची संख्या कमी आहे. यामुळे अनेकांना अवयव मिळत नाहीत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचा मानस असल्याने हा देखावा उभा केला. आणि अवयवदानाविषयी जनजागृती केल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अवयव दान म्हणजे काय, अवयवदान कोण करू शकते, अवयव दानाविषयी असलेले गैरसमज कोणते याविषयी गणेशभक्तांना माहिती मिळावी, यासाठी
मंडळात पथनाट्य सादर केली जातात. याचबरोबर मंडळामध्ये एक जागी नोंदणी विभाग तयार करण्यात आला आहे. जिथे इच्छुक अवयवदानाची प्रतिज्ञा करून अवयवदानासाठी नावनोंदणी करू शकतात. (प्रतिनिधी)