मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा, सर्व ग्राहकांना हरित ऊर्जा पर्यायाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:24 AM2021-05-24T08:24:42+5:302021-05-24T08:25:35+5:30

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मान्‍यता दिलेल्या योजनेच्‍या माध्‍यमातून मुंबईतील सर्व ग्राहकांना हरित ऊर्जेचा पर्याय उप्लबध करून देणार आहे. तसेच हरित ऊर्जेचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रमाणपत्र दिले जाईल.

Green energy for power consumers in Mumbai, green energy options for all consumers | मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा, सर्व ग्राहकांना हरित ऊर्जा पर्यायाची सुविधा

मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा, सर्व ग्राहकांना हरित ऊर्जा पर्यायाची सुविधा

Next

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी २०२३ पर्यंत ३० टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून निर्माण होणार आहे. एमईआरसीकडून मान्‍यता मिळाल्‍यानंतर हा करार करण्‍यात आला आहे. तसेच, अतिरिक्त १ हजार मेगावॅट ऊर्जेच्या खरेदीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर झाला असून, यापैकी बहुतांश वीज ही अपारंपरिक स्रोतातून तयार होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मान्‍यता दिलेल्या योजनेच्‍या माध्‍यमातून मुंबईतील सर्व ग्राहकांना हरित ऊर्जेचा पर्याय उप्लबध करून देणार आहे. तसेच हरित ऊर्जेचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्रात उल्लेख केलेला अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत पारदर्शक पद्धतीने तपासता येणार आहे. आयोगाकडून अगोदरच मान्य करण्‍यात आलेल्‍या प्रस्‍तावाच्‍या माध्‍यमातून क्षमता ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्‍यात येणार आहे. त्यासाठी १ हजार मेगावॅट ऊर्जा खरेदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यापैकी ५१ टक्क्यांहून अधिक ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून खरेदी करण्यात येणार आहे .
 

Web Title: Green energy for power consumers in Mumbai, green energy options for all consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.