मुंबई: बीएस्सी इन एव्हिएशन अर्थात, विमान उड्डाणाचे धडे देणाऱ्या अभ्यासक्रमाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आकाश भरारीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी एव्हिएशन अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बॉम्बे फ्लाइंग क्लबच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन येथे सुरू होणार आहे. यासाठीचे थेअरी क्लासेस गरवारे येथे होतील, तर प्रत्यक्ष विमान उड्डाणाचे प्रशिक्षण बॉम्बे फ्लाइंग क्लबच्या धुळे येथील संस्थेत दिले जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ँ३३स्र://ॅ्रूी.िी४ि.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)‘एव्हिएशन’ अभ्यासक्रमासाठीची पात्रताभौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण वेळ तीन वर्षांचा असून, एका वर्गासाठी केवळ ३० विद्यार्थी इतकी प्रवेश क्षमता आहे.एव्हिएशनचे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षण संस्था निवडतात, पण विद्यापीठाने देशातच हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यातून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल, शिवाय विद्यापीठाच्या बीएस्सी इन एव्हिएशन अभ्यासक्रमातून पदवी मिळेल, तसेच कमर्शिअल लायसन्सदेखील मिळवता येईल. त्यामुळे विद्यार्थी एव्हिएशन क्षेत्रातील व इतर प्रशासकीय विभागातील नोकऱ्यांसाठी पात्र ठरतील. - डॉ. अनिल कर्णिक, संचालक, गरवारे शिक्षण संस्था
मुंबई विद्यापीठाच्या ‘आकाश भरारी’ला हिरवा कंदील
By admin | Published: June 14, 2016 1:54 AM